Swami Samarth Guru Tarak Mantra Lyrics: PDF Download
Tarak Mantra PDF Download
- गुरु ब्रम्हा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा।
- गुरु साक्षात परब्रम्हा, तस्मै श्री गुरवे नमः॥
- निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना।
- प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
- अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
- अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।
- जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
- स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
- आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
- परलोकी ही ना भीती तयाला
- अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।२।।
- उगाची भितोसी भय हे पळु दे,
- वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
- जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
- नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
- अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।३।।
- खरा होई जागा श्रद्धेसहित,
- कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।
- आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
- नको डगमगु स्वामी देतील हात
- अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।४।।
- विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
- स्वामीच त्या पंचामृतात
- हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
- ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।
- श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।
- श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।
- बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।
- श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।~।।
- श्री स्वामी समर्थ महाराज की जय॥
- श्री दत्तगुरु महाराज की जय॥
- भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे।
- 🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌼🌺
- अशक्य ही शक्य करतील स्वामी !
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
Tarak Mantra PDF Download